profile-img

Dhanraj Sheravate

दुर्गा उद्योग समूह हा ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेला सामाजिक उपक्रम आहे. आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश महिलांच्या कौशल्यांचा विकास करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे. 

आम्ही अस्सल कोकणी पारंपरिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने जसे की गुळीच्या पाण्यापासून बनवलेले पापड, मिरगुंडी, खा रोडी इत्यादींचे उत्पादन करतो. ही उत्पादने केवळ दर्जेदार आणि चविष्टच नाहीत, तर स्थानिक संस्कृती आणि परंपरेचा स्वाद देखील जपतात. 

आम्ही महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देत असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेत प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम करतो. DUS ब्रँड च्या माध्यमातून आम्ही महिलांना एक नवा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतो. 

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी आम्ही समर्पित असून सामाजिक बदल घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे. 

QR Code

qr profile
Made By Souldigicard